Popular Posts

Monday, 17 November 2014

आज ती होती…मी होतो… पण नव्हते ते प्रेम…अन् ते नाते..!!

आज ती होती…मी होतो…
पण नव्हते ते प्रेम…अन् ते नाते..

भावना ही त्याच होत्या,
पण बदलले होते ते विचार…

दोघांच्या नज़रा ही त्याच होत्या,
पण एकमेकांमध्ये त्या
मिळवण्याची ती हिम्मत नव्हती..

मनाला आस खुप होती,
पण पुन्हा ठेस लावायची नव्हती..

स्वप्ने तशी अनेकच होती,
पण ती कधी पूर्ण होणारच नव्हती…

ती समोर असुन ही डोळे
तिच्याकडे आज पहात नव्हते…

कारण आज तिच्या बरोबर
कुणी दुसरेच होते…

डोळ्यात जरी अश्रु नव्हते,
तरी मनात मात्र तिचीच
आठवण होती…

आज जरी ती देहाने
माझी नव्हती तरी हृदयाने
सदैव ती माझीच होती…
अन् माझीच राहीन…

Wednesday, 12 November 2014

माझं स्वप्न आहे…

माझं स्वप्न आहे,
तुझ्यासोबत जगण्याचं,

हातात हात घेऊन,
एकाच दिशेन चालण्याचं,

माझं स्वप्न आहे,
तुला जवळून पाहण्याचं,

जवळ तुला घेऊन,
एकदा मिठीत घेण्याचं,

माझं स्वप्न आहे,
तुझ्या सोबत राहण्याचं,

छोटसं घरट बांधून,
त्यात दोघांनीच राहण्याचं,

माझं स्वप्न आहे,
तू स्वप्न बघण्याचं,
आणि दोघांनी मिळून,
ती पूर्ण करण्याचं,

माझं स्वप्न आहे,मी चित्र रेखाटण्याचं,
त्यात रंग भरून,ते तू रंगवण्याचं…

आयुष्यात कितीही कराल प्रेम कुणावर…

आठवणीच्या सागरात मासे कधीच पोहत नाही…
अमावस्येच्या रात्री चंद्र कधी दिसत नाही…!!

कितीही जगले कुणी कुणासाठी…
कुणीच कुणासाठी मरत नाही…!!

अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला…
पण नशिबाचे चक्र थांबत नाही…!!

आयुष्यात कितीही कराल प्रेम कुणावर…
त्याचे मोल सहज कुणाला कळत नाही…!!

बोलताही येत नाही आणि लपविताही येत नाही…

बोलताही येत नाही आणि
लपविताही येत नाही…
तुझ्यावर किती प्रेम आहे
हे सांगताही येत नाही…

पहिले जेव्हा तुला फक्त
तुलाच बघत राहिलो…
फक्त तुलाच पहावे असेच
दिनक्रम करत राहिलो…

खरच तुझ्या नादाने मी
स्वता:लाच हरवत राहिलो…
काय करू प्रेमाचा ताजमहलाला
सजवीताही येत नाही…

बोलताही येत नाही आणि
लपविताही येत नाही…

आज कुठे मी हरविलो आहे…

आज कुठे मी हरविलो आहे...
वास्तवात असूनही आज
मन स्वप्नं गुंफित आहे,
न जाणे वेड्या मनासवे…

... न जाणे आज मी कुठे
हरविलो आहे...

शब्दांचा अर्थ शोधतांना
शब्दच आज विरत आहे,

बेलगाम मनाला आवरता
न जाणे आज मी कुठे
हरविलो आहे...

ग्रीष्मातल्या प्रहरी
आज मेघ बरसत आहे,
मन चिंब भिजले असतांना
न जाणे आज मी कुठे
हरविलो आहे...
Rohan Patil

Monday, 10 November 2014

निरोप तुझा घेताना…

निरोप तुझा घेताना तुझ्यापासून फक्त शरीर दूर

जाते पण मन मात्र तुझ्यातच राहते....♥♥♥

माझ्या मनात जे काही येतं…

माझ्या मनात जे काही येतं…
एखादी कल्पना,एखादा विचार…

त्याची सुरुवात तुझ्यापासुन आणि शेवटही तुझ्यापाशीचं…

मी वेगळा काढुच शकतं नाही स्वतःला आणि जर समजा वेगळ झालेच तर मी - मी कुठं उरतो…!!