Popular Posts

Monday, 26 April 2021

माणुसकी !!


इतकंच मी म्हणतो तुला
माणुसकी तू जप जरा
जाती धर्माचा काय तमाशा
माणसाला माणूस मोल जरा

तुझंही रक्त लाल नी माझंही
मग कां अंतर जातीवादाचा
काय न्यायचं मरणावर सोबत
इथेच तर शांती हवी मनाला

माणसा तुझी उत्पत्ती काय
कोण तुला रे जन्म दिला
आईची सेवा सोडून तू
दगडाला या पुजू लागला

काही स्वार्थी आपले स्वार्थ साधून
भांडण लावती तुझ्यात भेद पाडून
जात धर्म नाहीरे इथे छोटं कुणाचं
अंगाची आग राहू न देई कुणा वाकून

कुणाच्या धर्माला दोष देऊ नको
आपलाच धर्म श्रेष्ठ ठरवू नको
तुझीच माती इथे तुझी नाही
डोक्याचा वापर न करता जगू नको

भांडण न करता भांडण सोडव कुणाचं
रडण्यापेक्षा अश्रू पूस तू कुणाचं
इथेच तुझं खरं स्वर्ग आहे
सर्वांना मनानं आपलं मान जरा …!!


Friday, 28 September 2018

त्याही पलीकडे ही मैत्रीची नाती असतात…!!

संकट हि आयुष्याला जगण्याच बळ देतात,
माणस सुद्धा संकटातच
आपली खरी ओळख दाखवतात…
नातीगोती फक्त रक्ताचीच नसतात,
त्याही पलीकडे ही मैत्रीची नाती असतात…!!

सूर्य ढगाआड गेला कि सर्व काही बदलत,
आपली माणस सुद्धा कधी परक्या सारखी वागतात…
आपल्या डोळ्यातून आसव ढळत असतानाही,
कधी - कधी ती बेधुंद आनंदाने नाचतात…!!

दोन पावलं एकट चालल्यावर मला कळाल,
स्वतःची सावली सुद्धा अंधारात साथ सोडत असते…
किती हि मोठा झाला माणूस तरीही,
शेवटी माणुसकी शिवाय शिल्लक काहीच उरत नसते…!!

दोन सेकंदात आता हृदय जग सोडणार होत,
तेवढ्यात एका हाताने मला पुन्हा सावरल होत…
मी तर पूर्णतः स्वतःला संपवलाच होत,
थांबलेल्या श्वासाला त्याने पुन्हा का जाग केल होत…!!

मैत्रीच्या नात्याला न रक्ताची गरज असते,
नाही त्याला कोणत्या गोष्टीची हाव असते…
हे नात फक्त दोन हृदयाचा ठाव असते,
खरंच जग संपेल हे कधी ,
पण मैत्रीच नात हे कधीच संपणार नसते…!!❤️

Tuesday, 24 January 2017

"अनुभव" म्हणजे काय हे तेव्हाच कळते...

"अनुभव"
म्हणजे काय हे तेव्हाच कळते...
असे मित्र बनवा,
जे कधीच साथ सोडणार नाही…
असे प्रेम करा,
ज्यात स्वार्थ असणार नाही…
असे ह्रदय बनवा कि,
ज्याला तडा जाणार नाही…
असे हास्य बनवा,
ज्यात रहस्य असणार नाही…
असा स्पर्श करा,
ज्याने जखम होणार नाही…
असे नाते बनवा,
ज्याला कधीच मरण नाही…

Saturday, 7 March 2015

प्रेम काय असत हे माहीत नव्हतं…!!

प्रेम काय असत हे माहीत नव्हतं...
प्रेमात कस पडतात ते माहीत नव्हतं…
प्रेम हा मुळात आपला
विषयच नव्हता,
मग त्यात पास होण्याचा
प्रश्नच येत नव्हता…
तिच्या अबोल हसण्याला मी
काय नाव देऊ…
डोळ्यातल्या भावनांना कसे
जाणून घेऊ…
तिच्यावर खरेच प्रेम केलेय,
हे तिला पटवून कसे देऊ…??

Monday, 1 December 2014

How To Improve Yourself…

1. Don't compare your life with others.
  You have no idea what their journey is
  all about

2. Don't have negative thoughts of
   things you cannot control. Instead
   invest your energy in the positive
   present moment.

3. Don't overdo ; keep your limits

4. Don't take yourself so seriously; no
    one else does.

5. Don't waste your precious energy on
   gossip.

6. Dream more while you are awake.

7. Envy is a waste of time. You already
    have all you need

8. Don't remind your partner of past
   mistakes. That will ruin your present
   happiness too. Make piece wit your
   past so it won't spoil the present.

9. Life is full of exciting things to waste
   time hating anyone.

10. No one is in change of your happiness
    except you.

11. Realise that life is a school and you are
   here to learn. Problems are simply
   part of the curriculum that appear
   and fade away but the lesson you
   learn will last a lifetime.

12. Smile and laugh more.

- TOI, The Speaking Tree
   (November30,2014)

Monday, 24 November 2014

ती सहज बोलुन गेली, विसरुन जा मला…

ती सहज बोलुन गेली, विसरुन जा मला…
त्या वेळी काही समजलेच नाही…
वारा वाहतो आहे की नाही समजलचं नाही…
डोळे मिटतायत की नाही समजलच नाही…
श्वास कसा घ्यायचा समजलचं नाही…
जगायचं कसे तिने शिकविले…
पण तिच्याशिवाय कसे जगायचं समजलचं नाही…
क्षण भरच सहवास राहीला,
आठवणी जवळ आल्या,
पण त्यांचे जतन कसे करायचे समजलचं नाही…!!
प्रेमाच्या या शिडीवर पाय ठेवला खरा,
पण शेवटची पायरीच मला दिसली नाही…!!

Thursday, 20 November 2014

दिसतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी…

निर्णय चुकतात आयुष्यातले
आणि
आयुष्य चुकत जाते…

प्रश्न कधी-कधी कळत नाहीत
आणि
उत्तर चुकत जाते…

सोडवताना वाटतं
सुटत गेला गुंता..
पण प्रत्येक वेळी नवनवीन
गाठ बनत जाते…

दाखविणाऱ्याला वाट
माहित नसते…
पण चालणाऱ्याचे ध्येय मात्र
हरवून जाते…

दिसतात तितक्या सोप्या
नसतात काही गोष्टी…

वाचून झाल्यावर शेअर कराच…